सत्र न्यायालयाने विजय राऊतसह तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Admin
0

 

https://www.barshivishesh.in
The sessions court rejected the bail applications of three persons including Vijay Raut
नागेश अक्कलकोटे प्राणघातक हल्ला प्रकरण

बार्शी : राष्ट्रवादीचे गटनेते नागेश अक्कलकोटे प्राणघातक हल्ला प्रकरणात नगरसेवक विजय राऊतसह तीन जणांनी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज, जिल्हा सत्र न्यायाधीश जयेंद्र जगदाळे यांनी फेटाळला आहे.

१ ऑगस्ट २०१४ रोजी अक्कलकोटे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्या प्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात विजय राऊत, दिपक राऊत, सोन्या हाजगुडे, मुन्ना बोते, डंग्या यादव, दिपक धावारे, रणजित चांदणे, प्रकाश राऊत, विशाल चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.

तत्कालीन तपास अधिकारी सालार चाऊस यांनी विजय राऊत, दिपक धावारे, रणजित चांदणे यांचे नावे सी.आर.पी.सी. १६९ प्रमाणे वगळण्याचा अहवाल व इतर आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयाकडे सादर केले होते.

सदर प्रकरणी अक्कलकोटे यांनी अॅड. अभिजित कुलकर्णी, अॅड. विकास जाधव, अॅड. प्रशांत एडके यांच्या मार्फत न्यायालयात आवाहन दिले होते.

विजय राऊत तत्कालीन माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे बंधू असलेमुळे असलेला राजकीय दबाव, तपास अधिकारी बदलल्या नंतर दोनच दिवसात दाखल झालेले दोषारोपपत्र या व इतर सर्व बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. ते ग्राह्य धरुन न्यायमूर्ती राऊत यांनी तपासीय अधिकारी यांनी सी.आर.पी.सी. १६९ प्रमाणे तीन आरोपी वगळण्याचा दिलेला अहवाल फेटाळून लावला व आरोपी विरोधात सदर शिक्षापात्र गुन्ह्यात प्रोसेस इश्युचे आदेश पारीत केले होते. 

त्यावर आरोपी विजय राऊत, दिपक ढावारे, रणजित चांदणे यांनी प्रथम वर्ग न्यायालयाच्या निर्णयास सत्र न्यायालयात रिव्हिजन अपील दाखल केले होते.

उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी वेळी अॅड. निंबाळकर यांनी राऊत यांची अपील मागे घेण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर न्यायालयाने अपील काढून टाकल्याचे जाहीर केले.

त्यानंतर विजय राऊत यांच्यासह तीन जणांनी बार्शी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी ६ मे रोजी अर्ज दाखल केला होता. 

यावर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश जगदाळे यांच्यासमोर झालेल्या सुनावणीच्या वेळी राऊत यांच्या वतीने अॅड.हर्षद निंबाळकर अॅड.महेश जगताप, अॅड.सागर रोडे यांनी बाजू मांडली तर फिर्यादी अक्कलकोटे यांच्यावतीने अॅड.अभिजीत कुलकर्णी, अॅड.विकास जाधव, अॅड. अक्षय काशीद यांनी बाजू मांडली. सरकार पक्षाच्यावतीने सरकारी वकील अॅड. राजश्री कदम यांनी बाजू मांडली. 

या सुनावणीच्या दरम्यान उपस्थित झालेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने, सध्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांना न्यायालयात बोलावून त्यांचीही बाजू न्यायालयाने ऐकली होती. अतिरिक्त सत्र न्यायालयात सुनावणीवेळी सरकार पक्षाच्यावतीने आरोपी अटकेची गरज ठामपणे मांडण्यात आली, तसेच पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांचे लेखी आणि तोंडी म्हणणे ही सादर केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)