![]() |
| Defamatory text on Facebook about Rupali Chakankar; Fir filed in Barshi |
बार्शी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह बदनामीकारक मजकूर फेसबुकवर लिहल्याबद्दल बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दि. १४ जून वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी रुपाली चाकणकर यांनी समाजमाध्यमावर 'मी लग्न झाल्यापासून एकदाही वडाला फेरे मारले नाहीत, माझ्या नवऱ्यानेही तसा हट्ट केला नाही.' अशी पोस्ट केली होती.
त्या पोस्टची कॉपी करुन आईच्या गावात अन् १२ च्या भावात या फेसबुक पेजवर या पोस्टबद्दल आपले मत काय असे विचारले होते. त्यावर 'दुसरा नवरा हवा असेल १२ मतीचा' अशी प्रतिक्रिया युवराज चंद्रकांत ढगे यांनी दिली होती.
तसेच रुपाली चाकणकर यांनी, 'समाजाला सत्यवानाची सावित्री कळली, पण जोतिबांची सावित्री कळलीच नाही 'असेही विधान केले होते. त्यावर आईच्या गावात अन् १२ च्या भावात या फेसबुक पेजने पटतयं का? असे विचारले होते. त्या पोस्टवर युवराज चंद्रकांत ढगे यांनी 'आधारवडाला फेरे मारल्यावर वडाला फेरे मारण्याची गरज नाही' असे उत्तर देऊन रुपाली चाकणकर यांच्याबद्दल मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन त्यांची बदनामी केली आहे, अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा उपाध्यक्ष सौ. सुवर्णा किशोर शिवपुरे, रा. बार्शी यांनी युवराज चंद्रकांत ढगे, रा. प्रसन्नदाता मार्ग, बार्शी यांच्या विरुध्द दिली आहे.
त्यानुसार बार्शी शहर पोलिस ठाण्यात भा.दं.वि. १८६० कलम ५०९ व माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६७ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
