![]() |
| Quarreling again even after the quarrel was settled; Incident at Upalai Thonge |
बार्शी : दि. २ मे रोजी शेताच्या बांधावरुन भावकीतील शुभांगी उमेश रगडे हिच्याशी झालेले भांडण मिटविण्यासाठी मी, मुलगा राजेंद्र, सून मैनाबाई तसेच उमेश मछिंद्र रगडे, शुभांगी उमेश रगडे, व गांवातील विजू ठोंगे, रणजीत वाघ, श्रीमंत रगडे (सर्व रा. उपळाई ठोंगे, ता. बार्शी) असे सगळे सकाळी झालेली भांडणे मिटविण्यासाठी संध्याकाळी साडेसहाचे सुमारास माझ्या घरासमोर बसलो असताना उमेश रगडे याने तुम्हाला फार माज आला आहे का असे म्हणून मला, माझा मुलगा राजेंद्र व सून मैनाबाई यांना शिवीगाळी करुन माझ्या हातावर काठीने मारुन जखमी केले. तसेच शुभांगी रगडे हिने शिवीगाळी करुन माझी सून मैनाबाई हिस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व परत आमचा नाद केला तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.
अशी फिर्याद कमल मनोहर रगडे (वय ५७) रा. उपळाई ठोंगे, ता. बार्शी यांनी दिल्यावरुन उमेश मछिंद्र रगडे व शुभांगी उमेश रगडे यांचेविरुध्द बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
