कारला ओव्हरटेक करताना एसटी बसला धडकून युवकाचा मृत्यु

Admin
0

https://www.barshivishesh.in
A youth was killed when he was hit by an ST bus while overtaking a car


बार्शी विशेष : भरधाव वेगांत मोटरसायकल चालवून पुढील कारला ओव्हरटेक करताना नियंत्रण सुटल्याने, समोरुन येणाऱ्या एसटी बसला धडकून युवकाला प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना घडली.

अमोल आधिक वायकर (वय २६), रा. आलेगांव, ता. माढा असे मृत्यु पावलेल्या युवकाचे नांव आहे. एसटी बस चालक बळीराम शंकर निलेवाड (वय ४८) रा. हाडोळती, ता. अहमदपूर, जि. लातूर यांनी या घटनेची फिर्याद दिली आहे. 

दि. १९ जून रोजी बस चालक निलेवाड हे बारामती ते तुळजापूर ही बस (क्र. एमएच-०६-एस-८९४९) घेऊन तुळजापूरकडे निघाले होते. सकाळी १० चे सुमारास कुर्डूवाडी बार्शी रस्त्यावरील तावरवाडी शिवारात बार्शीकडून एक पांढऱ्या रंगाची कार व तिच्यामागे एक मोटरसायकल (क्र. एमएच-४२-जे-२५२८) भरधाव वेगात येत होती. 

त्यावेळी मोटरसायकलस्वार त्या कारला ओव्हरटेक करत असताना कारच्या पाठीमागील बाजूस धक्का लागल्याने त्याचे नियंत्रण सुटले आणि तो बसच्या समोरील बाजूस धडकून खाली पडून तो गंभीर जखमी झाला. त्यांस अँब्युलन्समधून जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले असता, तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या अपघातात बस व मोटरसायकल अशा दोन्ही वाहनांचे नुकसान झाल्याची फिर्याद बसचालक बळीराम निलेवाड यांनी दिली, त्यानुसार बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)