![]() |
| 9 crore sanctioned for storage ponds at Agalgaon and Upalai : MLA Rajendra Raut |
बार्शी विशेष : बार्शी तालुक्यातील आगळगांव उपळाई (ठोंगे) येथील साठवण तलावास ९ कोटी २६ लाख ६२ हजार ४४ रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.
सदर योजनेस महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ मार्फत निधी उपलब्ध झाला असून, साठवण क्षमता प्रस्तावित केली आहे. प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग पुणे, यांनी नव्याने पाणी उपलब्धता प्रमाणपत्राची आवश्यकता नाही असे प्रमाणित केलेले आहे.
सदर योजनेच्या प्रशासकीय मान्यता अंदाजपत्रकानुसार आगळगांव येथील तलावाची साठवण क्षमता २६० स.घ.मी. असून, उपळाई (ठोंगे) येथील तलावाची साठवण क्षमता २४७ स.घ.मी. इतकी आहे. नियोजीत सिंचन क्षमता १२७ हेक्टर इतकी आहे.
सदर योजनेसाठी लाभधारकांची पाणी वापर संस्था स्थापन करणे अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे पाणी वापर संस्थेमार्फत देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी हस्तांतर करण्यास सहमती ठरावाद्वारे मान्यता घेणे आवश्यक आहे. सदरची योजना देखभाल दुरुस्तीसाठी नियमानुसार हस्तांतरित करावी लागणार आहे.
आत्ता पर्यंत आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळण्यासाठी लघु प्रकल्प, मध्यम प्रकल्प, साठवण तलाव मंजूर करुन घेतलेले आहेत. यातील अनेक प्रकल्प पूर्ण झालेले असून, याचा फायदा या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मिळत आहे.
बार्शी तालुक्यात हरीत क्रांतीचे सतत स्वप्न पाहून ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे आमदार राजेंद्र राऊत यांनी, बार्शी तालुक्यातील अनेक ठिकाणी साठवण तलाव करण्यासाठी शासन दरबारी पत्रव्यवहार करून सतत पाठपुरावा केला होता.
