वैराग पोलिसांनी केला अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त

Admin
0

 

https://www.barshivishesh.in
Vairag police seize tractor transporting illegal sand

वैराग (बार्शी विशेष) : नागझरी नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याची माहिती पो.नि. विनय बहिर यांना मिळाल्यावरुन, त्यांनी रवाना केलेले वैराग पोलिस पथक दि. १८ जून रोजी रात्री साडेबाराचे सुमारास धामणगांव येथील नदीपात्राकडे गेले असता, माने वस्तीजवळ एक डंपींग ट्रॉली असलेला विना क्रमांकाचा ट्रॅक्टर वाळू भरत असल्याचे दिसले.

पोलिसांची गाडी आलेली दिसताच चालक ट्रॅक्टरसह पळून गेला. त्यावेळी प्रताप मारुती बनसोडे, रा. हत्तीज, ता. बार्शी या वाळू भरणाऱ्या इसमाला पोलिसांनी पकडले. त्याला सोबत घेऊन पोलिसांनी ट्रॅक्टरचा पाठलाग करुन, चालकाला ट्रॅक्टर उभा करण्याचा इशारा केला तरीही तो न थांबता वेगाने जात राहिला. पोलिस गाडीने त्यांस ओव्हरटेक करुन थांबविण्याचा प्रयत्न केला असता, त्याने पोलिस गाडीस ट्रॅक्टर आडवा घालून कट मारुन पोलिस वाहन रस्त्याच्या खाली घातले आणि शेतातून ट्रॅक्टर पळवून नेला. 

पोलिसांनी सदर ट्रॅक्टरचा शोध घेतला त्यावेळी माने वस्तीजवळ बोधले महाराज यांचे घराजवळ फक्त ट्रॅक्टरचा हेड मिळून आला. ट्रॅक्टर चालक विकास जयराम दळवी, रा. हत्तीज, ता. बार्शी तसेच ट्रॅक्टर मालक प्रविण तुकाराम सुरवसे, रा. धामणगांव, ता. बार्शी व माऊली पंखे, रा. राळेरास, ता. बार्शी आणि डंपींग ट्रॉली तेथे मिळून आली नाही. वाहन चालक पो.कॉ. नवनाथ चवरे यांनी त्यांचेविरुध्द वैराग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)