एसटी संपाचा बळी; आणखी एका कर्मचाऱ्याने जीवन संपवले

Admin
0



एसटी संपाबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुरु असलेल्या खटल्याचा निकाल कर्मचाऱ्यांच्या बाजूने लागेल अशी अपेक्षा सगळ्याच संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना होती. पण यावर अद्यापही कोणताही निर्णय झाला नसल्याने आलेल्या नैराश्यातून आणखी एका एसटी कर्मचाऱ्याने टोकाचे पाऊल उचलत विहिरीत उडी मारून आपले आयुष्य संपविले आहे.

मुजफ्फर खान असे या मृत्यु पावलेल्या कर्मचाऱ्याचे नांव असून, ते परभणीच्या जिंतूर आगारात बस चालक म्हणून कामाला होते. त्यांनी भोगांवच्या शिवारातील विहिरीत उडी मारून आपलं आयुष्य संपविले.

त्यांच्या निधनाची वार्ता समजताच आंदोलनकर्त्यांनी त्यांचा मृतदेह आंदोलनस्थळी आणण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलिसांत बाचाबाची झाली.

एसटी संप गेल्या तीन महिन्यापासून सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यात एसटीचे विलीनीकरण करण्याची मागणी केली आहे. अद्याप यावर काही निर्णय लागला नाही. त्यामुळे  त्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. आता लवकरच काहीतरी चांगला निर्णय होईल या आशेवर एसटी कर्मचारी बसले आहेत. मात्र या बाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)