| Diesel worth twenty five thousand stolen from tipper's tank |
बार्शी : बालाजी किसन करडे (वय ३७) यांनी माझ्या अदित्य कष्णनगर, उपळाई रोड, बार्शी येथील राहत्या घरासमोर लावलेल्या माझ्या मालकीच्या टिपर पैकी टिपर क्र. MH 25 AJ 1171 च्या डिझेल टाकीचा खालचा नट काढून दि.२१ मार्च २०२२ च्या रात्री साडेबाराचे दरम्यान कोणीतरी तीन अज्ञात इसमांनी पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट तुकडा कारचा वापर करुन, सुमारे २७० लिटर डिझेल (अं. पंचेवीस हजार रुपये किंमतीचे) चोरुन नेले. अशी तक्रार बार्शी पोलीस ठाण्यात दिली आहे.
रात्री साडेबाराचे सुमारास कुत्रे भुंकण्याच्या आवाजाने जागे होऊन बाहेर येऊन पाहिले असता तीन अनोळखी इसम हातामध्ये पांढरे प्लॅस्टिक कॅन घेऊन टिपरसमोर उभे असल्याचे दिसले. त्यावेळी आरडाओरडा केला असता ते तिघेही पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट तुकडा कारमधून पळून गेले. यापूर्वीही टिपरच्या टाकीतून डिझेल बऱ्याचदा चोरीस गेले आहे. परंतु यापूर्वी तक्रार दिलेली नाही असे तक्रारीत नमूद केले आहे.