![]() |
| hit wife in the head for not giving money to drink alcohol |
बार्शी : दि. २२ मार्च २०२२ रोजी दुपारी बाराचे सुमारास मी कामावरुन घरी आले असता, माझे पती श्रीकांत रावसाहेब अंधारे, (वय ४०) रा.बाशिंगे प्लॉट, बार्शी यांनी मला दारु पिण्यासाठी दोनशे रुपये देण्याची मागणी केली केली.
मी पैसे देण्यास नकार दिला म्हणून मला शिवीगाळी, दमदाटी करत माझ्या पतीने मला घरातील बेलण्याने माझ्या डोक्यात तीन ठिकाणी मारुन जखमी केले. अशी फिर्याद पत्नीने बार्शी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
माझ्या पतीचा वाहतूकीचा व्यवसाय असून त्यांना खूप वर्षापासून दारु पिण्याचे व्यसन लागले आहे. त्यामुळे दारु पिऊन काहीतरी कारणांवरुन सतत भांडण करत असतात असे फिर्यादित नमूद केले आहे.
फिर्यादीनुसार बार्शी शहर पोलीस ठाण्यात भा.दं.वि. १८६० कलम ३२३, ३२४, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
