शेतकऱ्यांच्या बंद केलेल्या वीज पुरवठ्याच्या प्रश्न : विविध पक्ष व संघटनांच्यावतीने रास्ता रोको, मोर्चा व धरणे आंदोलन

Admin
0




ताला ठोको, रास्ता रोको आंदोलन करुन, विविध पक्ष व संघटनांनी तहसील व महावितरण कार्यालयांवर मोर्चा, धरणे आंदोलन करत शेतकऱ्यांच्या बंद केलेल्या वीज पुरवठ्याच्या प्रश्न लावून धरला.

बार्शी तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटना व शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना यांच्यावतीने, शेतकऱ्यांचा खंडित केलेला वीज पुरवठा त्वरित सुरु करावा या प्रमुख मागणीसाठी निदर्शने करण्यात आली. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. 

कॉ. प्रा. तानाजी ठोंबरे, कॉ. लक्ष्मण घाडगे, दत्तात्रय व्यवहारे यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने शेतकऱ्यांचा खंडित केलेला वीज पुरवठा त्वरित सुरु करावा या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

संभाजी ब्रिगेडच्यावतीने शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीज बंद केली म्हणून महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तत्पूर्वी उपळाई ठोंगे येथील महावितरणचे सबस्टेशन बंद करुन, श्रीपत पिंपरी येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. 

विविध पक्ष व संघटनांच्यावतीने तहसील कार्यालय ते महावितरण कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला व महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठाकडे पाठपुरावा करून, 'विद्युत पुरवठा चालू असतानाच वीज बिल वसूली' असा निर्णय घेतलेला असून शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा चालू झालेला आहे. त्यामुळे या धरणे आंदोलनाला यश आले आहे. शेतकऱ्यांनी वीज बिल भरावे.

- आनंद काशीद, तालुकाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)