![]() |
| auction process for sale of property if the arrears are not paid within 5 days after notice |
बार्शी : दोन दिवसापूर्वी बार्शी नगरपरिषदेने सर्व वर्तमानपत्रातून नगरपरिषदेच्या ज्यांच्याकडे पन्नास हजारांहून अधिक कराची थकबाकी आहे, अशा थकबाकीदारांची यादी प्रसिध्द केली आहे.
नगरपरिषदेच्या थकबाकी मध्ये प्रचंड मोठी वाढ झालेली आहे. या मार्च महिन्यामध्ये फक्त ४० ते ४२ टक्केच वसूली झाली आहे. रस्त्यावरची सफाई, गटारी, वीज, पाणीपुरवठा यासारख्या नागरी सेवा पुरविण्यासाठी वसूली नसल्याने नगरपरिषदेवर आर्थिक ताण येत आहे.
पाणीपुरवठा योजनेस तीस वर्षे कालावधी होऊन गेला आहे, त्याची मुदत आधीच संपून गेली आहे. भुयारी गटार योजनेचे काम झाल्यानंतर रस्त्याची कामे बऱ्यापैकी केलेली आहेत, काही ठिकाणची राहिलेली प्रस्तावित कामे लोकवर्गणी करुन करायची आहेत.
नागरिकांनी कर भरल्याशिवाय हे शक्य नाही, तरी सर्व नागरिकांना विनंती आहे की, त्यांनी कर भरुन नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन बार्शी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रसाशक अमिता दगडे पाटील यांनी केले आहे.
- ५० हजार रुपयांहून अधिक थकबाकी असलेले १५०० थकबाकीदार यांच्याकडून १८ कोटी ५० लाख रुपये येणे
- २५ ते ५० हजार रुपयांपर्यंत थकबाकी असलेले २५०० थकबाकीदार यांची नांवे लवकरच प्रसिध्द करणार
- एकूण थकबाकी ४६ कोटी त्यापैकी चालू मागणी १४ कोटी रुपये
- चालू १४ कोटीपैकी १० कोट वसूली तर पूर्वीच्या ३२ कोटीपैकी ४ कोटीची वसूली केली
- अजून एकूण ३२ कोटी वसूली करायची आहे
- २५ हजारांपासून पुढील सगळ्या थकबाकीदारांना वॉरंट इश्यू केले आहेत
- मालमत्ता विक्री नोटीसीनंतर ५ दिवसांत रक्कम न भरल्यास लिलाव प्रक्रिया राबवून मालमत्ता विक्री करणार
- हे करुन पण प्रतिसाद मिळाला नाही तर जिल्हाधिकारी मान्यतेने त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्याची कारवाई करणार
- १०० टक्के वसूली होईपर्यंत या मालमत्ता नागरिकांना कोणत्याही कामासाठी उपलब्ध रहाणार नाहीत
- थकबाकीवर २ टक्के व्याज व दंड आकारणीमुळे रक्कमेचे आकडे वाढतात त्यामुळे नागरिकांचे नुकसान
- लवकर पूर्ण बाकी भरल्यास तेथून पुढे व्याज व दंड भरावा लागणार नाही
- ३१ मार्च नंतरही ही प्रक्रिया सुरुच राहणार आहे
