![]() |
| So I will take out a rally at the Barshi police station |
मुंबई/बार्शी : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या संदर्भातील विषय उपस्थित केला. बार्शीत चालणारे अवैध धंदे आणि त्याबाबतची पोलीसांची भूमिका याबाबत त्यांनी काही मुद्दे मांडले.
ते म्हणाले की,सभागृहामध्ये सदस्यांनी बोलल्यानंतर त्यांच्यावर जर प्रशासन डूख धरणार असेल सदस्याने बोलायचं किंवा नाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो.
जर अशा प्रकारची वागणूक लोकप्रतिनिधींना मिळणार असेल तर मी स्वतः बार्शीला जाईन आणि हजारोंच्या मोर्चा घेऊन घेराव घालेन असा इशारा त्यांनी दिला.
देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेले काही मुद्दे
- राजेंद्र राऊत अपक्ष निवडून आले, तरी आमच्यासोबत बसले आहेत म्हणून कारवाई होत नाही.
- अवैध धंद्याबाबत पुराव्यासहित तक्रारी केल्या. त्यानंतर या लोकप्रतिनिधींना अक्षरशः टार्गेट करण्याचं काम हे त्या ठिकाणी चाललेलं आहे.
- मी स्वतः पूर्वीच्या डीजी ला आणि आत्ताच्या डीजी ला पुराव्यासहित त्याची तक्रार केली आहे. पण कारवाई होत नाही.
- त्यांच्या मुलाचा जीव धोक्यात आहे.त्याचे पत्र दिलेले आहे आणि त्यावर कारवाई होणार नाही हे पण माहिती आहे.
- काही लोकांना वाटतं की राजेंद्र राऊत यांना ठेचलं तर जास्त बरं.
- राजेंद्र राऊत यांना तर ओपनच सांगितले की तुम्हाला कुठल्या तरी गुन्ह्यात घेणारच आणि तुमच्या मुलाला तर शंभर टक्के फसवणारच.
- अशा प्रकारची वागणूक मिळणार असेल मी स्वतः त्या ठिकाणी जाईल आणि हजारोंचा मोर्चा घेऊन घेराव घालेल.
