दारु पिऊन शिवीगाळ व मारहाण केल्याची तक्रार

Admin
0


दि. ९ मार्च २०२२ रोजी रात्री नऊचे सुमारास दहिटणे स्टँडवरील दूध डेअरीवर दूध वाढून डेअरीजवळ मी थांबलो असताना गांवातील बालाजी बाळासाहेब काशीद, व धनाजी बाळासाहेब काशीद या दोघांनी दारु पिऊन विनाकारण शिवीगाळी करण्यास सुरवात केली. शिव्या का देता असे विचारले असता, बालाजी याने दगडाने पायावर मारहाण केली, धनाजी याने जोरात ढकलून खाली पाडले व अंगावर बसून खिश्यातील मोबाईल फोन काढून खाली आपटला. तसेच दोघांनी मिळून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात मला दुखापत झाली व मोबाईल फुटून नुकसान झाले.

चक्रधर काशीद, काकासाहेब अंधळकर, हणुमंत काशीद यांनी आमची भांडणे सोडविल्यानंतर, मी घरी गेल्यावरही त्यांनी माझ्या  घरासमोर येऊन मला व माझ्या आई वडिलांना शिवीगाळी करुन जिवे मारण्याची धमकी दिली. अशी फिर्याद प्रशांत चंद्रशेखर काशीद (वय ३०) रा.दहिटणे, ता.बार्शी वैराग पोलीस ठाण्यात दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)