नागझरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणारा ट्रॅक्टर पकडला

Admin
0



बार्शी तालुक्यातील मौजे हिंगणी (आर) येथील नागझरी नदीपात्रातून बेकायदेशीररित्या वाळू उपसा करुन ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भरण्याचे काम चार-पाच लोक करत असल्याची माहिती मिळाल्यावरुन वैराग पोलीसांनी दि. २७ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी सहाचे सुमारास तेथे छापा टाकला असता, ट्रॅक्टर चालक सोडून बाकी सर्व लोक पळून गेले.

तेव्हा पोलीसांनी चालकांस शासन परवान्याबाबत विचारपूस केली असता, त्याने परवाना नसल्याचे सांगतिले. त्यामुळे त्यांस ट्रॅक्टर ट्रॉली व वाळूसह पकडून वाहन किंमत सात लाख व वाळू अर्धा ब्रास किंमत साडेतीन हजार असा मुद्देमाल जप्त करुन वाहन वैराग पोलीस ठाण्यात आणून लावले.

वाहन चालक व मालक प्रविण तुकाराम सुरवसे (वय २९) रा. धामणगाव दु. ता. बार्शी याने विना परवाना व रॉयल्टी न भरता अवैधरित्या वाळू उपसा करुन, तसेच पर्यावरणाचा ऱ्हास होईल असे कृत्य केल्याबद्दल त्याच्या विरुध्द पो.कॉ. रामेश्वर राजेंद्र शिंदे यांनी भा. दं. वि. कलम ३७९ व पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ९, १५ प्रमाणे वैराग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)