ओन्ली समाज सेवा ग्रुपचे सदस्य व कॅन्सर हॉस्पिटल चौक रिक्षा थांबा येथील रिक्षा चालक सचिन श्रीमंत लोकरे यांना त्यांच्या रिक्षात एक किंमती मोबाईल विसरलेला आढळून आला. त्यांनी तो मोबाईल सुभाषनगर पोलीस चौकीत जमा केला.
याबाबत चौकशी करता त्यांच्या रिक्षामध्ये प्रवास करणारे प्रवासी लक्ष्मण जाधव यांचा तो मोबाईल असल्याचे समजले. त्याबाबत खात्री पटवून प्रवासी लक्ष्मण जाधव यांना तो मोबाईल भैया वाणी, राहुल वाणी, अकबर तांबोळी, अनिल खुडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल दबडे यांचे समक्ष परत दिला. लोकरे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.