पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ मे च्या मध्यरात्री फिर्यादी संदीप राजेश जगताप यांच्या सुभाष नगर परिसरातील गोडाऊनमधून अज्ञात चोरट्यांनी ८२ स्टिंग कोल्ड्रिंक्सचे बॉक्स चोरून नेले होते. याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोनि बालाजी कुकडे यांच्या सूचनेनुसार, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक अभय माकणे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळाच्या परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करुन ५ जून रोजी अनिकेत राजू केंगार आणि किरण मारुती पोठे, दोघे रा. पंकज नगर, बार्शी या दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांचेकडे कसून चौकशी केली असता त्यांनी या चोरीची कबुली दिली. चोरीस गेलेल्या मालापैकी ६१ स्टिंग कोल्ड्रिंक्सचे बॉक्स पोलिसांनी हस्तगत केले. या प्रकरणाचा पुढील तपास पोकॉ बहिरे करत आहेत.
ही कारवाई उपनिरिक्षक अभय माकणे, पोहकॉ माने, साठे, पोकॉ बहिरे, मुठाळ, राहुल उदार, पवार, नितनात, जाधव, देशमुख, राऊत, शेख, उघडे, जाधवर, अकुलवार, सोमवाड, भांगे, माळी यांनी केली.
