![]() |
| बीएसएनएलचा ‘कवच नंबर’ महिलांच्या मोबाईल गोपनीयतेसाठी उपयुक्त ठरणार |
बार्शी विशेष : जागतिक महिला दिनाचे (International Women’s Day) औचित्य साधून BSNL (Bharat Sanchar Nigam Limited) ने महिला ग्राहकांच्या Mobile Privacy आणि सुरक्षेसाठी 'Kavach' (कवच) नावाची एक विशेष सुविधा लाँच केली आहे. या सुविधेमुळे आता महिलांना त्यांचा Real Mobile Number गुप्त ठेवून सुरक्षितपणे Recharge आणि इतर व्यवहार करता येणार आहेत.
काय आहे BSNL Kavach Number?
अनेकदा मोबाईल रिचार्ज करण्यासाठी किंवा Retail Stores मध्ये सेवा घेण्यासाठी महिलांना आपला वैयक्तिक मोबाईल नंबर द्यावा लागतो. यातून नंबरचा गैरवापर होण्याचे किंवा त्रासदायक कॉल्स येण्याचे प्रकार घडतात. 'Kavach' सुविधेमुळे महिलांना त्यांच्या मूळ नंबरशी जोडलेला एक १० अंकी 'Alias' (टोपण) नंबर दिला जाईल. रिचार्ज आऊटलेट्स किंवा सर्व्हिस पॉइंट्सवर महिला हा Temporary alternate number देऊ शकतील.
या सुविधेची प्रमुख वैशिष्ट्ये (Key Features):
Privacy Protection: व्यवहार आणि रिचार्ज या पर्यायी नंबरवर केले जातील, मात्र ते आपोआप खऱ्या खात्यात जमा होतील. यामुळे तुमचा Actual phone number कोणालाही कळणार नाही.
Risk Reduction: नंबर सार्वजनिक ठिकाणी शेअर न केल्यामुळे अनावश्यक कॉल्स, Harassment, किंवा Stalking चे प्रकार रोखण्यास मदत होईल.
No Separate Connection: हा कवच नंबर म्हणजे वेगळे सिम कार्ड किंवा खाते नसून तुमच्या सध्याच्या नंबरला मिळालेली एक सुरक्षित प्रणाली आहे.
Secure Connectivity: महिलांना सुरक्षित आणि खाजगी कनेक्टिव्हिटी देऊन Fraud किंवा Privacy breaches टाळणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
कवच क्रमांक कसा मिळेल?
BSNL Self Care ॲप: या ॲपद्वारे तात्पुरता नंबर जनरेट करा.
कॉल करा: १५०० किंवा १८०० १८० १५०३ वर कॉल करा, ९ दाबून कस्टमर केअर प्रतिनिधीला 'कवच नंबर' सक्रिय करायला सांगा.
वेबसाइटवर माहिती उपलब्ध : याशिवाय, या फीचरशी संबंधित तपशीलवार माहिती बीएसएनएलच्या अधिकृत वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे.
वापर: हा तात्पुरता १० अंकी नंबर रिचार्ज करताना दुकानदाराला सांगा. जेथे अनेकदा रिचार्जसाठी महिलांना दुकानात जावे लागते अशा ग्रामीण भागातील व छोट्या शहरांमधील महिलांसाठी हे फिचर हे फिचर विशेष उपयुक्त ठरेल.
