| पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर |
बार्शी विशेष : भारतीय निवडणूक आयोगाने Election Commission of India पाच राज्यांच्या Assembly Election 2026 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. या निवडणुका पश्चिम बंगाल (West Bengal), तमिळनाडू (Tamil Nadu), केरळ (Kerala), आसाम (Assam) आणि पुदुच्चेरी (Puducherry) या राज्यांमध्ये होणार आहेत.
◥ केरळ (Kerala) च्या १४० , आसाम (Assam) मधील १२५ आणि पुदुच्चेरी (Puducherry) तील ३० मतदारसंघासाठी ९ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात voting होणार आहे.
◥ तमिळनाडू (Tamil Nadu) राज्यातील २३४ जागांसाठी २३ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
◥ पश्चिम बंगाल (West Bengal) येथे Assembly Election मधील २९४ जागांसाठी दोन टप्प्यांत होणार असून १५२ मतदारसंघात २३ एप्रिल आणि १४२ मतदारसंघात २९ एप्रिल रोजी मतदान होईल.
◥ या सर्व राज्यांतील मतमोजणी vote counting ४ मे २०२६ रोजी होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने Election Commission दिली आहे.
◥ या निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणावर security forces आणि प्रशासन यंत्रणा तैनात करण्यात येणार असून निवडणुका निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यावर आयोगाचा भर असल्याचे सांगितले.
