डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना बार्शी तालुक्याची नूतन कार्यकारिणी जाहिर

Admin
0

 

Digital Media Editor Journalist Association Barshi Taluka New Executive body Announced

बार्शी विशेष : डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या बार्शी तालुक्याची नूतन कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. यामध्ये दिनेश मेटकरी (बार्शी टाईम्स) अध्यक्ष, अमिन गोरे (स्टार वन न्यूज) उपाध्यक्ष, धीरज शेळके (हिंदवी समाचार) सचिव तर विक्रांत पवार (स्वामिनी न्यूज) कोषाध्यक्ष याप्रमाणे सन २०२३-२४ साठी निवड जाहिर करण्यात आली. 

यावेळी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य संतोष सूर्यवंशी (साप्ताहिक बार्शी जनता टाईम्स), जिल्हा उपाध्यक्ष विजय कोरे (महाराष्ट्र डिजीटल न्यूज), मानद सल्लागार मयूर गलांडे (बार्शी टाईम्स), मावळते अध्यक्ष अजय पाटील (विजेता टाईम्स) कार्यकारीणी सदस्य रमण कारंजकर (बार्शी विशेष), भैरवनाथ चौधरी (बी वन न्यूज मराठी), निलेश उबाळे (माय मराठी न्यूज), विकी गोंदकर (संघर्ष न्यूज) तसेच पत्रकार संजय बारबोले (प्रतिनिधी दै.जनसत्य), विजय शिंगाडे (साप्ताहिक बार्शी जनसेवा), अपर्णा दळवी (बार्शी टाईम्स), शाम थोरात (बार्शी जनता टाईम्स, डिजीटल) आदी उपस्थित होते.

यावेळी संतोष सूर्यवंशी, अजय पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्तविक धीरज शेळके यांनी तर आभार दिनेश मेटकरी यांनी मानले. मान्यवरांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसे उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)