बार्शीत एकाच दिवशी चाकूचा धाक दाखवून पैसे उकळल्याच्या दोन घटना

Admin
0

 

https://www.barshivishesh.in
Two incidents of extortion at knifepoint on the same day in Barshi

बार्शी विशेष : बार्शीत एकाच दिवशी चाकूचा धाक दाखवून पैसे उकळल्याच्या दोन घटना घडल्या. पहिल्या घटनेत दारु पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने मारहाण करुन तर दुसऱ्या घटनेत स्टॉलमधील गल्ल्यातून तिघाजणांनी जबरदस्तीने पैसे काढून घेतल्याची तक्रार दाखल झाली आहे.

जालिंदर मच्छिंद्र जाधव (वय ५२), रा. ४२२, गाडेगांव रोड, बार्शी यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. गवंडी काम करणारे जाधव हे दि. १७ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबाराचे सुमारास, त्यांचा कामगार भारत यांसह मजुरांची आठवड्याची पगार देण्यासाठी भगवंत मैदान येथे बसले असता, १) विजय अनिल बारबोले, २) ऋतिक शिंदे व ३) शिवम बोराडे (सर्व रा. बार्शी) हे तिघेजण त्याठिकाणी आले. 

त्यापैकी विजय बारबोले याने जाधव यांना चाकूचा धाक दाखवून दारु पिण्यासाठी पैसे दे म्हणून धमकावले. त्यांस त्यांनी नकार दिला असता तिघांनी झटापट करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी विजय बारबोले याने हातातील चाकू त्यांच्या गळ्यास लावला, तर दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्यांना जखमी केले. आरोपी क्र. २ याने त्यांच्या खिशातील साडेचार हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले.

जालिंदर जाधव हे उपचार घेऊन पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता त्यांना समजले की, त्याच दिवशी दुपारी दोनचे सुमारास सदरील तीन आरोपींनी बार्शीतील भाजी मंडईतील नवनाथ दिगंबर काळे (वय ५२) यांच्या स्वामी जिलेबी स्टॉल येथे जाऊन त्यांच्या गल्ल्यात मोजून ठेवलेले पाच हजार रुपये व ग्राहकाचे आलेले अं. पाचशे रुपये असे साडेपाच हजार रुपये आरोपी क्र. १ याने चाकूचा धाक दाखवून आरोपी क्र. २ याने त्यांच्या गल्ल्यातील पैसे जबरदस्तीने काढून घेतले आहेत.  जाधव यांनी याचा उल्लेख करुन एकूण दहा हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याची फिर्याद दिली आहे.

बार्शी शहर पोलिस ठाण्यात वरील तिघांविरुध्द भा.दं.वि. १८६० कलम ३९४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)