![]() |
| Barshikar wrote a Postcard with the message of planting trees; A initiative of Vrukhsa Sanvardhan Samitee |
बार्शी विशेष : सध्याच्या ईमेल, व्हॉटसअपच्या जमान्यात पोस्टकार्डच्या माध्यमातून पत्र लिहणे ही बाब दुर्मिळ झाली आहे. पण बार्शीच्या वृक्ष संवर्धन समितीने 'वृक्ष लागवड आणि संवर्धनाचा' संदेश देणारी एक नाही दोन नाही तर, दहा हजार पंचाहत्तर इतकी पत्रे नागरीक व शालेय विद्यार्थ्यांकडून एका दिवसात लिहून घेण्याचा वेगळा उपक्रम केला आहे. भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि ९ ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधत समितीने घेतलेल्या या उपक्रमामुळे जेष्ठांना त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देता आला तर विद्यार्थ्यांना पत्रलेखनाचा आनंद अनुभवता आला.
या उपक्रमामध्ये नागरिक व शालेय विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले. आपल्या प्रियजणांना प्रत्येकाने एक पत्र लिहून 'हर घर तिरंगा, हर घर एक पेड' असा संदेश दिला. या उपक्रमासाठी लागलेली पत्रे वृक्ष संवर्धन समितीने मोफत पुरविली.
देशासाठी आपणही काही तरी देणं लागतो याच भावनेतून आपणही किमान एक झाड लावले पहिजे आणि ते संवर्धित केले पाहिजे. यामुळे आपला देश, आपलं राज्य आणि आपलं गांव सुंदर हरित होऊन पर्यावरणाचे संतुलन आणि संवर्धन होण्यास मदत होणार आहे. ही देखील मोठी देश सेवाच आहे. याच उद्देशातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे यांनी सांगितले.
या उपक्रमात बार्शीतील, महाराष्ट्र विद्यालय, सिल्वर ज्युबली प्रशाला, सुलाखे हायस्कूल, सुलाखे इंग्लिश मेडियम, बार्शी टेक्निकल हायस्कूल, सुयश विद्यालय, महात्मा फुले विद्या मंदिर, जिजामाता विद्यामंदिर, साधना कन्या प्रशाला, मॉडेल हायस्कूल, कन्या प्रशाला, न्यु हायस्कूल, जनसेवा हायस्कूल, अभिनव हायस्कूल, दिलिप सोपल हायस्कूल, सोजर इंग्लिश मेडियम, एम.आय.टी. स्कूल, सेंट जोसेफ, पोद्दार स्कूल, अँग्लो उर्दू हायस्कूल, ज्ञानज्योत क्लास, गुळमिरे प्रशाला तसेच न्यू इंग्लिश स्कूल, दडशिंगे ता.माढा, कन्या शाळा, टेंभुर्णी ता. माढा, जि. प. प्राथमिक शाळा, वाकडी, ता. परंडा, लोकसेवा हायस्कूल आगळगांव, नविन मराठी शाळा, वैराग, नागनाथ हायस्कूल, घारी या शाळांनी सहभाग घेतला.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी बार्शी शिक्षण मंडळाचे पर्यवेक्षक संजय पाटील, माजी प्राचार्य शशिकांत धोत्रे, अजित नडगिरे, उदय पोतदार, राहूल तावरे, राणा देशमुख, सायरा मुल्ला, अक्षय घोडके, अमृत खेडकर, सुनिल फल्ले, अक्षय भुईटे, अशोक जाधवर, योगेश गाडे, अक्षय काटकर, समाधान विधाते, सौदागर मुळे, डॉ. प्रविण मिरगणे, डॉ. वसुदेव सावंत, तेजस विधाते, अनमोल वाघमारे, उमेश नलवडे, संतोषकुमार गायकवाड, महेश पायघन, डॉ. सचिन चव्हाण, रेखा विधाते, अनुसया पवार, विरेंद्र भांडे, महेश बकशेट्टी, बुगडे सर, गणेश कदम, आदींनी परिश्रम घेतले.
.jpg)
.jpg)