![]() |
| Thieves stole the motorcycle of a carpet seller |
बार्शी विशेष : गावोगांवी फिरुन चटई विक्री करणाऱ्या परप्रांतीय विक्रेत्याची मोटरसायकल चोरट्यांनी बार्शीतून पळविल्याची घटना घडली. तोफान गोरिलाल बंजारा (वय २७) रा. असाउद्दीन, ता. सामगड, जि. मंदसौर, मध्यप्रदेश याने याबाबतची फिर्याद दिली आहे.
तोफान त्याच्या इतर नातेवाईकांसह सध्या परांडा रोडवरील भराडिया पेट्रोल पंपासमोरील आकाश अण्णासाहेब कदम यांच्या घरी भाड्याने रहात आहे. दि. २३ जुलै रोजी रात्री त्याने त्याची डिलक्स मोटरसायकल क्र. एमपी-११-एमक्यू-५३७८ घरासमोर हँडललॉक करुन लावली आणि जेवण करुन ते झोपी गेले.
रात्री तीनचे सुमारास त्याचा भाऊ रमेश बाथरुमसाठी उठला असता, त्याला घरासमोर गाडी दिसली नाही. त्यामुळे त्याने तोफानला उठवून घरासमोर गाडी नसल्याचे सांगितले. त्या दोघांनी मिळून आजपर्यंत आजूबाजूला गाडीचा शोध घेतला पण ती मिळून आली नाही.
त्याने दि. २९ जुलै रोजी मोटरसायकल चोरीस गेल्याची फिर्याद बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.
पोलिसांचे मौन
बार्शी शहरातून आत्तापर्यंत अनेक मोटरसायकल चोरीस गेल्या आहेत व जात आहेत. पण त्यांचा शोध लागलेला नाही. पोलिस याबद्दल मौन बाळगून आहेत.
