तालुक्यातील गौडगांव व तांबेवाडी साठवण तलावासाठी १४ कोटींचा निधी मंजूर : आ. राजेंद्र राऊत

Admin
0

 

https://www.barshivishesh.in
14 crore sanctioned for Gaudgaon and Tambewadi storage lakes in the barshi taluka

बार्शी विशेष : बार्शी तालुक्यातील तांबेवाडी येथील नव्याने करण्यात येणाऱ्या साठवण तलावासाठी ८ कोटी, १४ लाख, ६४ हजार, ८५९ रुपये व गौडगांव येथील साठवण तलावास ६ कोटी, ३१ लाख,  ५४  हजार, ५८५ रुपये, असे एकूण १४ कोटी, ४६ लाख, १९ हजार, ४४४ रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ. राजेंद्र राऊत यांनी दिली.

सदरच्या योजनेस महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ मार्फत निधी उपलब्ध झाला असून साठवण क्षमता प्रस्तावित केली आहे. प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग पुणे, यांनी नव्याने पाणी उपलब्धता प्रमाणपत्राची आवश्यकता नाही असे प्रमाणित केलेले आहे. सदर योजनेच्या प्रशासकीय मान्यता अंदाजपत्रकानुसार गौडगांव येथील तलावाची साठवण क्षमता ३५०.२३ स.घ.मी. असून, तांबेवाडी येथील तलावाची साठवण क्षमता ४५१.०५ स.घ.मी. इतकी आहे. दोन्ही साठवण तलावाची साठवण क्षमता ८०१.२८ स.घ.मी. असून नियोजीत एकूण सिंचन क्षमता १६८ हेक्टर इतकी आहे.

सदर योजनेसाठी लाभधारकांची पाणी वापर संस्था स्थापन करणे अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे पाणी वापर संस्थेमार्फत देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी हस्तांतर करण्यास सहमती ठरावाद्वारे मान्यता घेणे आवश्यक आहे. सदरची योजना देखभाल दुरुस्ती साठी नियमानुसार हस्तांतरित करावी लागणार आहे.

या साठवण तलावांची मंजूरी व त्यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विशेष शिफारस करुन मदत केली असल्याचे राऊत यांनी सांगितले.

आत्तापर्यंत आ. राजेंद्र राऊत यांनी बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळण्यासाठी लघु प्रकल्प, मध्यम प्रकल्प, साठवण तलाव मंजूर करुन घेतलेले आहेत. यातील अनेक प्रकल्प पूर्ण झालेले असून, याचा फायदा या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मिळत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)