![]() |
| The mobile of the court clerk was stolen from the vegetable market |
बार्शी विशेष : महत्वाची कार्यालयीन माहिती जतन केलेला न्यायालयातील लिपीकाचा मोबाईल, मंडईतून भाजी खरेदी करेपर्यंत चोरट्याने लांबविल्याची घटना घडली.
महेश अरुण पोतदार (वय ४५), रा. सन्मित्र हाउसिंग सोसायटी, अलिपूर रोड, बार्शी यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.
बार्शी न्यायालयात वरिष्ठ लिपीक पदावर कार्यरत असणारे पोतदार शनिवार दि. १८ जून रोजी सकाळी भोगेश्वरी मंदिरासमोरील महात्मा फुले भाजी मंडईच्या कमानी समोर भाजी घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी रेडमी कंपनीचा नोट प्रो ९ मोबाईल त्यांच्या शर्टच्या वरील खिशात होता.
भाजी खरेदी केल्यानंतर शर्टच्या खिशात मोबाईल नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत भाजी विक्रेत्यांकडे व आजूबाजूला चौकशी केली परंतु मोबाईल सापडला नाही. त्यांच्या मोबाईलमध्ये न्यायालयाच्या देयक विभागाची महत्वाची माहिती जतन केलेली होती. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बार्शी शहर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
