![]() |
| 800 kg plastic seized in Barshi and fined Rs 12,000; Municipal council action |
बार्शी : बार्शी नगरपरिषदेने सिंगल यूज प्लॅस्टिक वापरणाऱ्या शहरातील दुकानदारांविरोधात धडक कारवाई मोहीम सुरु केली आहे. या अंतर्गत शहरातील आनंद प्लॅस्टिक, खुशबू पान, योगेश प्लॅस्टिक यांचेवर दंडात्मक कारवाई करून आठशे किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले.
केंद्र सरकारच्या पर्यावरण, वने व वातावरणीय बदल मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार बार्शी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामार्फत बार्शी शहरामध्ये ही कारवाई सुरु करण्यात आली आहे.
मुख्य बाजारपेठ, टाकणखार रोड या भागात ही कारवाई करण्यात आली. यावेळी संबंधितांकडून १२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. यापुढेही प्लॅस्टिक वापरणाऱ्यांवर कडक कारवाई करुन, वेळप्रसंगी त्यांचेवर गुन्हे सुध्दा दाखल करण्याची कारवाई नगरपरिषदेमार्फत करण्यात येणार आहे.
सदर कारवाई बार्शी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत आरोग्य विभाग प्रमुख शब्बीर वस्ताद, स्वच्छता निरीक्षक नितीन शेंडगे, हर्षल पवार, मुकादम नेमीनाथ पवार, सुपरवायझर अतिश रोकडे, आनंद कांबळे, सचिन सोनवणे, जयपाल वाघमारे, कनिष्क शिंदे, अप्पा चौगुले, विनोद लंकेश्वर, उत्तरेश्वर अवघडे, दिपक कसबे व इतर कर्मचारी सहभागी झाले होते.
