Dedication of Panpoi on behalf of Jai Shivrai Pratishthan
बार्शी : रखरखत्या उन्हात कोरड्या पडलेल्या घश्याला ओलावा मिळावा म्हणून ज्या ठिकाणी ग्रामीण भागातील नागरीक मोठ्या प्रमाणामध्ये येतात व जे नागरिक सहज व सोप्या पद्धतीने पाणी बाटली घेऊ शकत नाहीत, अशा गरजू नागरिकांसाठी जय शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने सहकारीदूत ऋषिकांत पाटील व पाणीदूत बाबासाहेब बारकुल यांच्या सहकार्यातून छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा जगदाळे मामा हॉस्पिटल येथे पाणपोई क्रमांक १ व तहसील कार्यालय बार्शी येथे पाणपोई क्रमांक २ चे लोकार्पण वृक्ष संवर्धन समिती सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी जय शिवराय प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.