Two vehicles worth Sixty lakh seized in illegal sand transport case
राळेरास/वैराग : नागझरी नदीपात्रातील वाळु चोरुन भरुन नेत असल्याची माहिती बातमीदारांकडून मिळाल्यावरुन वैराग पोलिसांनी कारवाई केली.
आरोपी समाउन हबीब मोहमद (वय २६), रा. तालबारी, साटियारा, चिरडया, पुर्णिया, चेरिया, बिहार व नादर आबुलाल शेख (वय ५०), रा. जवळा, ता. सांगोला यांनी दि. २७ मार्च २०२२ रोजी पहाटे साडेचारचे सुमारास मौजे राळेरास, ता. बार्शी या गांवचे शिवारातील स्मशान भूमीच्या पूर्वेला बाळपुरी गोसावी यांच्या शेताजवळील नागझरी नदीच्या पात्रातून, शासनाचा कसल्याही प्रकारचा परवाना न घेता, रॉयल्टी न भरता, पोकलेन मशीनच्या साह्याने चोरुन वाऴू उपसा करुन टिपरमध्ये भरुन घेवून जात असताना मिळून आल्याने, त्यांचेकडील ५० लाख रुपये किंमतीची एक पोकलेन मशीन, १० लाख रुपये किंमतीचा एक टिपर व २१ हजार रुपये किंमतीची तीन ब्रास वाळू जप्त करुन, त्यांचे विरुध्द भा. द. वि. कलम ३७९, पर्यावरण संरक्षण अधिनियम ९ व १५ प्रमाणे वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.