![]() |
| Solapur Rural Police Website 'Not Updated' |
बार्शी : सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या संकेतस्थळाचे बऱ्याच दिवसांपासून अद्ययावतन करण्यात आलेले नाही.
बार्शी तालुका पोलिस ठाण्याचा जुना फोटो आणि 'मच्छी मार्केटजवळ, पोस्ट चौक, बार्शी' जुना पत्ता यामध्ये अद्यापही बदल करण्यात आलेले नाहीत. तर बार्शीचे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून अजूनही 'अभिजीत धाराशिवकर' यांचेच नांव आणि फोटो संकेतस्थळावर कायम आहे.
बार्शी उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या ईमेल अॅड्रेसवर पाठविलेला मेल 'डिअॅक्टिव्हेटेड' कारणाने परत येणे, बार्शी शहर व तालुक्यातील पोलिस ठाण्यांना पाठविलेल्या ईमेलना उत्तर न मिळणे असे अनुभव येत आहेत.
.png)

.png)