मुंबई पोलिस तयार करणार टी शर्ट, टोपी अशा वस्तू : संजय पांडे

Admin
0

https://www.barshivishesh.in/
Mumbai Police will make T-shirts, caps and such other items: Sanjay Pandey




मुंबईकरांसाठी संडे स्ट्रीट सुरु

मुंबई : मुंबई पोलिसांकडून टी शर्ट, टोपी, कप, स्वेटर, ट्रॅकसूट, परफ्यूम, पाणी बॉटल यासारख्या विविध वस्तू बनवण्यात येणार आहेत. मुंबई पोलिसांकडून बनविण्यात येणाऱ्या या वस्तू शोरूममध्ये विकल्या जातील. या वस्तूंच्या विक्रीतून मिळणारे पैसे पोलिसांच्या कल्याण निधीसाठी वापरले जातील, अशी माहिती संजय पांडे यांनी फेसबुकवरून संवाद साधताना दिली आहे.

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पदभार स्विकारल्यानंतर मुंबईकरांसाठी वेगवेगळ्या घोषणा केल्या आहेत. त्यापैकी ही एक घोषणा आहे. फेसबुकद्वारे मुंबईकरांशी संवाद साधून त्यांच्या समस्या देखील जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 

आयुक्त संजय पांडे यांच्या संकल्पनेतून आजपासून मुंबईकरांसाठी संडे स्ट्रीट सुरु करण्यात आले आहेत. मुंबईकरांना तणावमुक्त करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या पुढाकाराने मुंबईत सहा ठिकाणी हे संडे स्ट्रीट सुरु करण्यात आले आहेत. मुंबईकरांना रस्त्यावर येवून मनोरंजन, योगा, स्केटिंग, सायकलींग तसेच सांस्कृतिक खेळ यासारखे कार्यक्रम करता यावेत यासाठी संडे स्ट्रीट ही संकल्पना राबविण्यात येत आहे. प्रत्येक रविवारी सकाळी ६ ते १० वेळेत रस्ते वाहतुकीसाठी बंद करुन ते नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. याची सुरुवात आजपासून झाली.

आज संजय पांडे यांनी मरीन ड्राइव्ह या ठिकाणी या संडे स्ट्रीटमध्ये सहभाग घेतला आणि दौड केली. मरीन ड्राइव्ह परिसरात मोठ्या प्रमाणात मुंबईच्या विविध भागातून नागरिक दाखल झाले होते. कोणी या मोकळ्या रस्त्यावर बॅडमिंटन खेळत होते, कोणी सायकलींग करीत होते, तर कोणी स्केटिंग आणि योगा करीत होते. या संकल्पनेचे मुंबईकरांनी जल्लोषात स्वागत केले. त्याचबरोबर मुंबईच्या विविध भागात ही संडेस्ट्रीट तयार करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)