क्लासला गेलेली बार्शीतील अल्पवयीन मुलगी बेपत्ता

Admin
0




https://www.barshivishesh.in/
Missing minor girl from Barshi who went to class

बार्शी : अल्पवयीन बहिणीस क्लासमधील सीईटी परिक्षेस जाण्यासाठी तिच्या भावाने बार्शीतील कोर्ट चौक येथे दि.२४ मार्च २०२२ रोजी सकाळी साडेनऊ वाजता सोडले. त्या अल्पवयीन मुलीने तिच्या वडिलांच्या मोबाईलवर बेडखाली चिठ्ठी आहे असा पाठविलेला मेसेज सकाळी दहा वाजता तिच्या वडिलांना दिसला.

त्यांच्या मुलीचा स्वभाव एकलकोंडा व चिडचिडेपणाचा असल्यामुळे, त्यांना याबाबत संशय आला. त्यामुळे आई, वडिल व भाऊ यांनी मिळून बेडरुममध्ये शोध घेतला असता, मुलीने तिच्या हस्ताक्षरात लिहलेली चिठ्ठी त्यांना सापडली. 

त्या चिठ्ठीत मुलीने, 'मी आत्महत्या करतेय, या जगाला कंटाळून गेलीय, तुम्हाला आणि सगळ्यांना कारण आहे पेपर टेन्शन आणि बरंच काही. माझे जाण्याला कोणीच जबाबदार नाहीये. ना यात क्लासचा संबध आहे, ना कोणत्या पोरीचा. हे सगळं माझे मर्जीने करतीय. कोणालाही जबाबदार धरु नका आणि कोणाचं नांव यांत खराब करु नका.' असा मजकूर लिहलेला आढळला.

यामुळे घाबरुन जाऊन मुलीच्या वडिलांनी, त्यांच्या लहान भावास ही गोष्ट सांगितली आणि त्या सर्वांनी मिळून बार्शी शहर व परिसरांत मुलीचा शोध घेतला. परंतु तिचा ठावठिकाणा न लागल्याने शेवटी त्यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)