माझी वसुंधरा अभियानातील नविन मराठी शाळेतील यशस्वी विद्यार्थीनी व शिक्षकांचा सत्कार

Admin
0




स्वच्छ भारत सर्वेक्षण २०२२ अंतर्गत माझी वसुंधरा अभियान २.० मध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबविले गेले. या उपक्रमामध्ये नविन मराठी शाळा सहभागी झाली होती. 

शाळेतील विद्यार्थिनी कु.संजना तोंडले व कु. आर्या कांदे यांनी वक्तृत्व व निबंध स्पर्धेत क्रमांक पटकावले. व शाळेने उत्तम कामगिरी केल्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक वाघमारे सर व विद्यार्थीनी यांचा मा.मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील, प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे, संजय पाटील यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

बार्शी एज्युकेशन सोसायटीचे सचिव अनंत कवठाळे सर यांनी नवीन मराठी शाळा, बार्शीचे मुख्याध्यापक वाघमारे, शिक्षक व विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर खुने यांनी केले तर उमेश नायकुडे यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)