पेपरफुटीचे प्रकरण आढळल्यास त्या शाळेची मान्यता रद्द होणार

Admin
0
https://www.barshivishesh.in/

मुंबई : परीक्षेदरम्यान पेपरफुटीची प्रकरणे आढळल्यास त्या शाळांची मान्यता काढून घेतली जाईल, तसेच कॉपीचे प्रकार आढळले तर यापुढे त्या शाळांना परीक्षा केंद्र दिले जाणार नाही अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

परीक्षा सुरु असताना राज्यात काही ठिकाणी गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. सध्या कोरोनामुळे शाळा तिथे केंद्र सुरु केले असताना कॉपीचे प्रकार आढळून येत आहेत. यामुळे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी घोषणा केली आहे.

परीक्षेदरम्यान पेपरफुटीची प्रकरणे आढळल्यास त्या शाळांची मान्यता काढून घेतली जाणार आहे. तसेच कॉपीचे प्रकार आढळले तर यापुढे त्या शाळांना परीक्षा केंद्र दिलं जाणार नाही अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत बोलताना दिली आहे. 

अहमदनगर आणि औरंगाबादमध्ये पेपरफुटीची प्रकरण आढळून आलेल्या शाळांची मान्यता काढून घेण्यात आल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)