मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे, मराठी भाषेचे संवर्धन झाले पाहिजे तसेच रोजच्या व्यवहारात मराठी भाषेचा जास्त वापर झाला पाहिजे असे प्रतिपादन जयसिंग कदम यांनी केले.
जेष्ठ साहित्यिक, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस. हा दिवस मराठी भाषा वाढीसाठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा करावा या महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयनुसार, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बार्शी आगारात आज मराठी भाषा दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुलाखे हायस्कुलचे शिक्षक जयसिंग कदम व नंदकुमार सोनवणे हे तर अध्यक्षस्थानी आगारप्रमुख मोहन वाकळे, जेष्ठ पत्रकार नाना गव्हाणे आदी उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी बार्शी बसस्थानकात भव्य रांगोळी काढण्यात आली होती.
याप्रसंगी वाहतूक अधिक्षक नितीन गावडे, वाहतूक नियंत्रक राजेंद्र कवळासे, हेड मॅकनिक नंदकुमार धुमाळ, पंकज सावंत, भाग्यलक्ष्मी माने, पल्लवी जाधव, रेखा सुपेकर, मिनाक्षी मोरे आदींसह सहाय्यक व चालक आणि वाहक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पुरुषोत्तम वाघुलकर तर आभारप्रदर्शन तुषार थोरात यांनी केले.