मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मागील दोन दिवसांपासून खा. युवराज संभाजीराजे छत्रपती मुंबईतील आझाद मैदान येथे बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत. आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आंदोलनस्थळी संभाजीराजे छत्रपती यांची भेट घेऊन आंदोलन संपवण्याची विनंती केली. मात्र, संभाजीराजे यांनी समाजाच्या मागण्यांबाबत सरकारकडून लेखी निर्णय व भरीव अंमबजावणी सुरू होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार व आझाद मैदान सोडणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.