![]() |
Passenger transport of Barshi depot resumed due to attendance of staff |
बार्शी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी प्रलंबित विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. त्यादरम्यान प्रवाशांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागला, तर महामंडळाला देखील फार मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला.
कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचे प्रकरण हायकोर्टात प्रलंबित होते व मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २२ एप्रिल अखेर ९५ टक्के कर्मचारी कामावर हजर झालेले आहेत. उर्वरीत ५ टक्के कर्मचारी प्रशासकीय प्रक्रियेनंतर कामावर हजर होतील, तर चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी व प्रशासकीय कर्मचारी १०० टक्के कामावर हजर झाले आहेत.
बार्शी आगारातून सुटणाऱ्या सर्व लांब व मध्यम लांब पल्ल्यांच्या फेर्या पूर्ववत सुरु झालेल्या असून उर्वरित ग्रामीण फेऱ्या येत्या सोमवारपासून सुरु करणार असल्याचे, तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत विविध सवलतीचे पास विक्री चालू असून पास धारकांनी बार्शी आगारात येऊन आपले पास काढून घ्यावेत, तसेच एसटी बसची वाहतूक सुविधा संपुर्णतः सुरक्षित असून प्रवाशांनी एसटी बस मधूनच प्रवास करावा, खाजगी प्रवासी वाहतूक मार्गाने प्रवास करू नये असे आवाहन बार्शीचे आगार व्यवस्थापक मोहन वाकळे यांनी केले आहे.