पुरी सोसायटी निवडणुकीत सोपल गटाची एकहाती सत्ता

Admin
0

 

https://www.barshivishesh.in
One-sided power of Sopal group in Puri Society elections

बार्शी : पुरी येथील वि.का.से.स. सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सोपल गटाने एक हाती सत्ता मिळविली. बुधवार दि. २० एप्रिल २०२२ रोजी सोसायटीची मतदान प्रक्रिया जि.प.प्रा. शाळा पुरी येथे पार पडली. 

मतदान वेळ संपल्यानंतर लगेचच मतमोजणी करण्यात आली. या निवडणुकीत सोपल गटाचे सर्व १२ उमेदवार विजयी घोषीत करण्यात आले. निकालानंतर विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करुन फटाक्याची आतिषबाजी केली. मतदान शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले.

विजयी उमेदवार (सर्व साधारण गट) विनोद झालटे, खंडेराव पाटील, सुखदेव झालटे, कल्याण दिडवळ, किसन झालटे, लालासाहेब दिडवळ, प्रदिप झालटे, कुंडलिक झालटे (सर्वसाधारण महिला) सौ. संगीता पाटील, सौ. जयश्री झालटे (इतर मागास प्रवर्ग) शशीकांत उपरे (अनुसुचित जाती जमाती) दिलीप पालके

निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन सचिन महाडिक यांनी काम पाहिले.

विजयी उमेदवारांचे माजी मंत्री दिलीप सोपल, युवराज काटे, नंदकुमार काशिद, बाळासाहेब तातेड, अ‍ॅड. बबन झालटे, श्रीराम घावटे यांनी अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)