![]() |
Theft of motorcycles in Barshi will not stop |
बार्शी : बार्शीतील राजमाता नगर, उपळाई रोड येथून पुन्हा मोटरसायकल चोरीला जाण्याची घटना घडली.
रामेश्वर परमेश्वर मुळे (वय ४०) रा.राजमाता नगर, उपळाई रस्ता, बार्शी यांचे आडत दुकान असून, दि. ९ एप्रिल २०२२ रोजी रात्री आठचे सुमारास ते व्यवसाय करुन घरी आले. नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांची हिरो स्प्लेंडर प्लस मोटरसायकल क्र. एमएच-१३-सीपी-२७५६ ही घरासमोर हँडल लॉक करुन लावली. त्यानंतर जेवण करुन एक तासाने बाहेर आले असता, घरासमोर लावलेली मोटरसायकल दिसून आली नाही. आजूबाजूस व परिसरात शोध घेऊनही न सापडल्यामुळे त्यांनी बार्शी शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा नोंद झाला आहे.
- मोटरसायकलच्या चोऱ्या काही थांबेनात