पंढरपूरच्या येत्या आषाढी वारीला दिंड्यांसह माऊली जाणार

Admin
0



https://www.barshivishesh.in
The next Ashadhi Wari of Pandharpur will be Mauli with Dindis

२१ जून रोजी होणार प्रस्थान


आळंदी : तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या सोबत हजारो वारकऱ्यांना आषाढी वारीला पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला पायी जाता येणार आहे. 

यंदा आळंदी येथून २१ जून रोजी माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे पाटील यांनी ही माहिती दिली आहे. 

गेली दोन वर्षे कोरोनाच्या प्रभावामुळे शेकडो वर्षांची परंपरा असलेली पंढरीची पायी वारी खंडित झाली होती. त्यामुळे वारकरी दुःखी कष्टी झाले होते. अनेक वारकरी, कीर्तनकारांचा कोरोनामुळे अंत झाला. 

त्यामुळे 'देवा हा कोरोना लवकर जाऊ दे आणि तुझी भेट लवकर होऊ दे' असे आर्जव वारकरी करत होते. जणू पंढरीरायाने त्यांची ही प्रार्थना ऐकली आणि गेल्या महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्ण कमी झाला आहे. त्यामुळे मंदिरे खुली झाली आहेत आणि यंदा पायी पालखी सोहळाही होणार आहे. 

श्री क्षेत्र पंढरपूर येथील संत ज्ञानेश्वर महाराज मठात आषाढी वारी पायी दिंडी पालखी सोहळा नियोजनाची बैठक पार पडली. त्यात पायी पालखी सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. यंदा तिथी वृद्धी झाल्याने लोणंद, फलटण येथे दोन दिवस मुक्काम वाढला आहे. 
दिंडीकऱ्यांच्या मागणीवरून संस्थानच्या सही शिक्क्याने यंदा वाहन पास देण्यात येणार आहे. 

https://www.barshivishesh.in

असा असेल पालखी सोहळा


  • आळंदी येथून मंगळवार दिनांक २१ जून २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रस्थान ठेवेल. 
  • बुधवार आणि गुरुवारी दिनांक २३ जून रोजी सोहळा पुणे मुक्कामी असेल. 
  • शुक्रवार, शनिवार (दि. २५) - सासवड 
  • रविवारी (दि. २६) - जेजुरी 
  • सोमवारी (दि. २७) - वाल्हे 
  • मंगळवार आणि बुधवारी (दि. २९) - लोणंद 
  • गुरुवारी (दि. ३०) - तरडगाव 
  • शुक्रवार व शनिवारी (दि. २ जुलै) - फलटण 
  • रविवारी (दि. ३) - बरड 
  • सोमवारी (दि. ४) - नातेपुते 
  • मंगळवारी (दि. ५) - माळशिरस 
  • बुधवारी (दि. ६) - वेळापूर 
  • गुरुवारी (दि. ७) - भंडीशेगाव 
  • शुक्रवारी (दि. ८) - वाखरी 
  • शनिवारी (दि. ९) - श्री क्षेत्र पंढरपुर मुक्कामी 
  • रविवारी दिनांक १० जुलै रोजी आषाढी एकादशीचा महासोहळा पार पडणार आहे. 

येथे होणार उभे रिंगण 


  • चांदोबाचा लिंब 
  • बाजीराव विहीर 
  • इसबावी 

येथे होणार गोल रिंगण 


  • पुरंदावडे (सदाशिवनगर) 
  • पानीव पाटी 
  • ठाकुरबुवा 
  • बाजीराव विहीर


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)