![]() |
Teacher's Indica Vista car stolen; Incident at Upale Dumala |
बार्शी : उपळे दुमाला येथील शिक्षकाच्या घरासमोरुन इंडिका व्हिस्टा कार चोरीस गेल्याची घटना घडली.
उपळे दुमाला येथील ग्लोरी इंग्लीश मेडियम स्कूलमध्ये शिक्षक असलेले गणेश अशोक बुरगुटे (वय ४२), रा. उपळे दु. ता. बार्शी यांनी २०१९ साली इंडिका व्हिस्टा कार क्र. एमएच-१३-एसी- ४७९२ घेतलेली होती.
कारच्या डाव्या बाजूच्या दरवाजाचे लॉक खराब असल्याने त्यांनी दि. २३ एप्रिल रोजी कार घराला चिटकून मोकळ्या जागेत लावली. व रात्री दहाचे सुमारास घरातील सर्वजण जेवण करुन झोपी गेले.
नेहमीप्रमाणे सकाळी साडेसात वाजता उठून घराचे बाहेर आल्यानंतर, त्यांना कार दिसून आली नाही. त्यांनी व त्यांच्या मुलाने कारचा आजूबाजूस शोध घेऊनही ती सापडली नाही. त्यानंतर व्हॉटस्अप, फेसबुकवर कार चोरीस गेल्याबद्दल पोस्ट टाकून कुणाकडून काही तरी माहिती मिळेल यासाठीही प्रयत्न केला. पण दोन दिवस प्रयत्न करुनही कार न सापडल्याने बुरगुटे यांनी दि. २५ एप्रिल रोजी वैराग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तिविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.