![]() |
Tanker damaged due to cut by private travel bus and passengers in the bus injured |
बार्शी : नामदेव यशवंत घोलप, (वय ४८) रा. तळेगाव, ता. जि. बीड हा टँकर चालक, दि. ९ एप्रिल २०२२ रोजी सकाळी साडेसहाचे सुमारास अशोक लेलँड कंपनीचा टँकर क्र. एमएच-२३-एयू-३००१ मोलॅसीस भरुन निरा बारामतीकडे जात असताना, त्याचवेळी बार्शीकडून लातूरकडे जाणारी खाजगी ट्र्रॅव्हल बस क्र. एनएल-०१-बी-१८५९ याने भरधाव वेगात येवून टँकरला समोरुन धडक देवून कट मारला. त्यामुळे टँकरची समोरची काच, मोलॅसीसची टाकी, शो पिस यांचे अंदाजे पन्नास हजाराचे नुकसान झाले.
तसेच ट्रॅव्हल बसमधील प्रवासी रितेश नरसिंग शिंदे, नितेश नरसिंग शिंदे, नरसिंग शिवाजी शिंदे, महादेवी अशोक गायकवाड (सर्व रा. भवानी दाबका, ता. औराद, जि. बिदर, कर्नाटक) व इतर दोन इसम (त्यांचे नांव, गांव पत्ता माहिती नाही) यांना लहान मोठी दुखापत होणेस कारणीभूत ठरल्यामुळे, ट्रॅव्हल बस चालक दिनेश किसन मंडलीक (वय ३७) रा. नारायणगांव, ता. जुन्नर, जि. पुणे याचे विरुद्ध नामदेव घोलप याने तक्रार दिली आहे. त्यानुसार पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.