संजय पाठक दैनिक 'पुढारी' सोलापूरचे वृत्तसंपादक

Admin
0

https://www.barshivishesh.in
Sanjay Pathak took over as the news editor of Dainik Pudhari Solapur

सोलापूर : दैनिक 'पुढारी' सोलापूर आवृत्तीचे वृत्तसंपादक म्हणून संजय पाठक यांनी मंगळवार दि. १२ एप्रिल २०२२ रोजी सूत्रे हाती घेतली.

पाठक यांच्या पत्रकारितेची कारकीर्द सोलापूर येथील दैनिक तरुण भारत, संचार, लोकमत या वृत्तपत्रातून सुरु झाली. 'सकाळ' मिडीया ग्रुपमध्ये त्यांनी मुख्य उपसंपादक पदावर काम पाहिले.  सकाळमध्ये गेली २२ वर्षे ते कार्यरत होते. 

'सुखद काही' व 'टिक्कोजीरावांचे फेटे आणि फटकारे' ही त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. सोलापूर आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या 'मंथन' या कौटुंबिक श्रुतिका मालेचे लेखनही ते  करत असतात.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)