आ. राजेंद्र राऊत यांच्या हस्ते तालुकास्तरीय आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन

Admin
0

 

https://www.barshivishesh.in
Inauguration of taluka level health fair by Mla Rajendra Raut

बार्शी : ग्रामीण रुग्णालय बार्शी येथे, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय रोगनिदान व उपचार  मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन आ. राजेंद्र राऊत यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

शिबिराच्या सुरुवातीला आ. राजेंद्र राऊत यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करुन दीप प्रज्वलन करण्यात आले.

https://www.barshivishesh.in

याप्रसंगी बोलताना, सर्वांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करुन, आ. राजेंद्र राऊत यांनी आयोजकांचे कौतुक केले.

या प्रसंगी नायब तहसीलदार संजीवन मुंडे, डॉ. प्रशांत मोहिरे, डॉ. अशोक ढगे, डॉ. शितल बोपलकर, डॉ. तांबारे, डॉ. मांजरे, डॉ. घोडके आदी मान्यवर उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)