![]() |
| Beaten by the anger of a previous quarrel |
बार्शी विशेष : दि. ४ जुलै रोजी दुपारी चारचे सुमारास शेजारी रहाणारे तुकाराम सुरेश लावंड, नामदेव सुरेश लावंड, ज्ञानेश्वर सुरेश लावंड यांनी मागील भांडणाचा राग मनात धरुन दगडाने व हवा भरण्याच्या लोखंडी पंपाने डोक्यात व अंगावर मारहाण करुन जखमी केले, माझी आई व भाऊ सोडविण्यास आले असता, त्यांनाही मारहाण करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली. अशी फिर्याद रतनचंद वसुदेव शिंदे (वय ३३), रा. फुले प्लॉट, उपळाई रोड, बार्शी यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार भा.दं.वि. १८६० कलम ३२३, ३२४,३४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
