![]() |
| Matang community should take to the streets in large numbers: Ramesh Bagwe |
बार्शी : महाराष्ट्रात दलितांच्या मध्ये मातंग समाजाची लोकसंख्या दोन नंबरला आहे .समाजात मोठ्या प्रमाणात विविध संघटना असून त्यामध्ये संपूर्ण मातंग समाज विखुरलेला आहे. समाजाला न्याय आणि हक्क मिळून घ्यायचा असेल तर समाजाने संघटित व्हायला पाहिजे व प्रस्थापितांना धडा शिकवण्याकरिता मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले पाहिजे असे प्रतिपादन मातंग हक्क परिषदेचे अध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री रमेश (दादा) बागवे यांनी केले. अन्यय विरोधी आंदोलनाच्या वतीने आयोजित केलेल्या बार्शीतील लिंगायत बोर्डिंग मध्ये झालेल्या परिषदेची सुरुवात राजर्षी शाहू महाराज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विचारपीठावर माजी गृहराज्यमंत्री रमेश दादा बागवे परिषदेचे स्वागताध्यक्ष बार्शी तालुक्याचे आमदार राजेंद्र राऊत माजी आमदार राम भाऊ गुंडीले उदगीर माजी आमदार राजाभाऊ आवळे इचलकरंजी माजी आमदार पृथ्वीराज साठे अंबाजोगाई डी पी आय चे नेते सुकुमार कांबळे अजिंक्य चांदणे अशोक लोखंडे मातंग परिषदेचे निमंत्रक नवनाथजी चांदणे श्रीधर कांबळे प्राध्यापक जेटी जाधव माजी नगरसेवक ज्योतिर्लिंग कसबे अमोल चव्हाण दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनील अवघडे निलेश खुडे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना बागवे म्हणाले की सर्व एकत्र आले तर समाजाचे चित्र बदलेल समाजातील तरुणाने शिक्षण उद्योगात लक्ष द्यावे बाबासाहेबांचे आपल्या दलित समाजावर खूप मोठे उपकार असून शासनाच्या विविध योजना समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचत नाहीत त्या पोहोचवण्याचे काम शिकलेल्या युवकांनी करावे. आपणच आपले पाय ओढायचे आता बंद केले पाहिजे असे सांगून समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात रस्त्यावर उतरून प्रस्थापितांना धडा शिकवला पाहिजे असेही बागवे म्हणाले. यावेळी आरटीआय मतलब गाडी चे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे अजिंक्य चांदणे राजू आवळे प्रा सुकुमार कांबळे पृथ्वीराज साठे अशोक लोखंडे राम गुंडीले यांनी समाजाला मार्गदर्शन करत असताना समाजाने संघटीत होऊन आपल्या हक्काचा लढा उभा केला पाहिजे जोपर्यंत मातंग समाज आपले उपद्रवमूल्य दाखवत नाही तोपर्यंत मातंग समाजाची कोणीही दखल घेणार नाही असाही सूर सदर हक्क परिषदेत निघाला. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आनंद चांदणे कुणाल खंदारे अक्षय अवघडे आशिष शिंदे भास्कर बगाडे राज देवकुळे उमेश जाधव सुरज कसबे सुधाकर शेंडगे अभी लोंढे अतिश जाधव मोनू चव्हाण विजय शेंडगे लाला बगाडे अभिषेक माने आदींनी परिश्रम घेतले. सदर मातंग परिषदेत सर्वानुमते खालील ठराव करण्यात आले.
१) लहुजी वस्ताद अभ्यास आयोगाची अंमलबजावणी व्हावी. २) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लहुजी वस्ताद साळवे स्मारक लवकरात लवकर व्हावे. ३) पार्टीच्या धरतीवर आर टी अण्णाभाऊ साठे संशोधन केंद्र निर्माण व्हावे. ४) महाराष्ट्रातील रमाई घरकुल वरील घरपट्टी रद्द व्हावी. ५) मातंग समाजातील जनतेला 200 युनिट वीज माफ व्हावी मातंग समाजातील बेरोजगारांचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा मातंग समाजातील तरुणांना उद्योगास प्रोत्साहन म्हणून एन एस एफ डी सी योजना अण्णाभाऊ साठे महामंडळ च्या माध्यमातून त्वरित सुरू करावी. ६) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त व्यक्तींना महिन्याकाठी दहा हजार रुपये मानधन सुरू करावे. ७) मातंग समाजातील वृद्ध कलावंतांना वाघ्या मुरळी आराधी तमाशा कलावंत रामोशी यांचे संशोधन होऊन त्यांना मानधन मिळावे तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या वतीने प्रत्येक तालुक्यात कला कौशल्य केंद्र उभारण्यात यावे. ८) महाराष्ट्रातील नगरपालिका स्वच्छता कर्मचारी वारसा पद्धतीने ताबडतोब भरती करण्यात यावी. ९) ॲट्रॉसिटी ॲक्ट कायद्याची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे व्हावी महाराष्ट्रातील मातंग समाजावर होणारे अन्याय अत्याचार बलात्काराची प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढावे. १०) लहुजी वस्ताद साळवे आयोगाच्या शिफारशीनुसार मातंग समाजातील प्रत्येक कुटुंबाला अडीच एकर जमीन समाजकल्याण खात्याने त्वरित द्यावी. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अन्याय विरोधी आंदोलनाचे प्रमुख माजी उपनगराध्यक्ष नवनाथजी चांदणे यांनी केले सूत्रसंचालन अनिल हातागळे यांनी तर आभार आनंद चांदणे यांनी मानले.
