![]() |
| Welcoming Gajanan Maharaj's palkhi with tree dindi in Barshi |
बार्शी विशेष : शेगांवकडे परतवारीने प्रस्थान ठेवलेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन आज बार्शी शहरांत झाले. या पालखीचे स्वागत वृक्ष संवर्धन समिती बार्शीच्या वतीने, वृक्ष दिंडी काढून करण्यात आले.
कुर्डूवाडी बाह्यवळण रस्ता येथे पालखी येताच, रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून हातात एक एक रोपटे घेऊन पालखीचे स्वागत करण्यात आले.
त्यानंतर पालखीच्या पाठीमागे हातात रोपटे घेऊन वृक्ष दिंडी काढून समितीने या सोहळ्यात सहभाग घेतला. तसेच यावेळी वृक्ष लागवड व संवर्धनाबाबत घोषणांचा जागरही करण्यात आला. लोकांमध्ये वृक्ष लागवड व संवर्धनाबाबत जागरुकता निर्माण व्हावी याच हेतूने या वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी झाडच-विठ्ठल, झाडच-रखुमाई असा संदेश लिहलेल्या टोप्या वृक्ष संवर्धन समितीच्या सर्व सदस्यांनी परीधान केल्या होत्या. या दिंडीचे कुर्डूवाडी बाह्यवळण रस्ता ते शिवशक्ती मैदानापर्यंत आयोजन करण्यात आले होते. या वेळी वृक्ष संवर्धन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

